नगर: विजेचा धक्का बसून पोलीस मुख्यालयातील युवतीचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसापासून परिसरात विजेचा प्रवाह येत असल्याचे सांगळे गल्ली येथील महावितरण विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली.
लालटाकी रोडवरील पोलीस मुख्यालयात वीजखांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून पूजा सुनील कुऱ्हे (वय-23) या युवतीचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला.
कुऱ्हे यांच्या घरासमोर वीजखांब आहे. या वीजखांबाच्या अर्थिंगचा जोड कुऱ्हे यांच्या घरासमोरील पायरीपर्यंत आहे. पूजा सकाळी या अर्थिंगच्या जवळ गेले असता तिला विद्युत प्रवाहाचा जोरदार झटका बसला. यात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी नातेवाइकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना तिची मृत्यू झाला. पोलीस हवालदार सुनील कुऱ्हे यांची ती मोठी मुलगी आहे.
पूजा ही एमबीए (मास्टर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट) शिकत होती. कुऱ्हे हे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. पूजा तिच्या पश्चात आई-वडील आणि एक लहान बहीण आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या निष्कळजी पणामुळे ही घटना घल्याने पूजाचा मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे.