नवी दिल्ली – समाजवादी पर्टीचे माजी खासदार आतिक अहमद अणि अन्य काही जणांच्या विरोधात सीबीआयने तुरुंगातूनच उद्योगपतीचे अपहरण करण्याचा कट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मोहित जैसवाल या रिअरल इस्टेट व्यवसायिकाचे गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये अपहरण करण्याच्या आरोपाखाली अहमद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जैसवाल यांचे लखनौमधून अपहरण करून देओरिया तुरुंगात नेण्यात आले होते. त्याच तुरुंगात अहमद आणि त्यांच्या साथीदरांना ठेवलेले होते. अहमद आणि त्यांच्या साथीदारांनी जैसवाल यांना मारहाण केली आणि रिअल इस्टेटचा धंदा हस्तांतरित करण्यास भाग पाडले होते. आतिक अहमद हे 2004 ते 2009 दरम्यान समाजवादी पार्टीकडून उत्तर प्रदेशातील फुलपूर येथील खासदार होते.