सलमानच्या “भारत’ला आतापर्यंत बऱ्यापैकी यश मिळाले आहे. “भारत’ने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता सलमान आपल्या फॅन्सना एक भन्नाट सरप्राईज देण्याच्या तयारीत आहे. त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरूनच ही माहिती दिली आहे. त्याने ट्विटरवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने “कुछ नया आ रहा है’ असे म्हटले आहे, या व्हिडीओमध्ये सलमान मोठ्या आरामखुर्चीत निवांत बसलेला दिसतो आहे.
मात्र या व्हिडीओ मेसेजमधून नवीन “काय’ येणार आहे, हे हे स्पष्ट होत नाही. मात्र त्याच्या या मेसेजमुळे सल्लूच्या फॅन्सची उत्कंठा मात्र ताणली गेली आहे, हे नक्की. “बिग बॉस 13’ची अनाउन्समेंट करण्याची तयारी सलमान करतो आहे, असा अंदाज काही जणांनी व्यक्त केला. तर सलमान त्याच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा करण्याच्या तयारीत असल्याचा अंदाजही काही जणांनी व्यक्त केला आहे.
सध्या सलमान “दबंग 3’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याशिवाय संजय लिला भन्साळीच्या “इन्शाअल्ला’मध्ये तो पहिल्यांदाच आलिय भट बरोबर दिसणार आहे. एवढेच नव्हे तर चंगेझ खानच्या बायोपिकमध्ये काम करण्याची ईच्छाही सलमानने यापूर्वीच व्यक्त केली आहे. कदाचित त्याचीच घोषणा सलमानला करायची असेल.