उत्तरप्रदेश – 2019 लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. सातव्या टप्प्यात एकूण 59 जागांसाठी हे मतदान होत असून एकूण 918 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. सकाळी 7 च्यासुमारास मतदानाला जोरदार सुरवात झाली असून, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील 246 गोखपूर मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath exercises his franchise at polling booth no. 246 in Gorakhpur. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/heXwytEqlY
— ANI UP (@ANINewsUP) May 19, 2019
सातव्या टप्प्यात सात राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात मतदान होत आहे. यामध्ये बिहारमध्ये 8, हिमाचल प्रदेशमध्ये 4, झारखंड 3, मध्य प्रदेशात 8, पंजाब 13, उत्तर प्रदेश 13, पश्चिम बंगाल 9 तर चंदीगड एका जागेवर मतदान पार पडणार आहे. सुमारे दहा कोटी मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.