एमएसएलटीए योनेक्स राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धा
पाचगणी – मुलांच्या गटात अपरुप राव रेड्डी, तर मुलींच्या गटात सिंजीनी मिथुन, आदिती लाखे, सलोनी परिदा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत एमएसएलटीए योनेक्स राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धा रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत आहेत. पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत महाराष्ट्राच्या बिगरमानांकित अपरुप राव रेड्डीने तेलंगणाच्या सहाव्या मानांकित धीरज रेड्डीचा टायब्रेकमध्ये 6-7(3), 6-1, 6-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून मुख्य फेरी गाठली.
मुलींच्या गटात आदिती लाखेने तिसऱ्या मानांकित चिन्मयी बागवेचा 3-6, 6-2, 6-0 असा तीन सेटमध्ये पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली. सलोनी परिदा हिने चौथ्या मानांकित संचिता नगरकरचे आव्हान 6-0, 6-1 असे मोडीत काढत आगेकूच केली. कर्नाटकाच्या सिंजीनी मिथुनने सातव्या मानांकित महाराष्ट्राच्या अलिना शेखला 6-2, 2-6, 6-4 असे पराभूत केले.
मानांकीत खेळाडू : मुले – मानस धामणे(महाराष्ट्र), वंश नांदल (हरयाणा), रेथीन प्रणव (तामिळनाडू), काहीर वारिक (महाराष्ट्र), ओमांश सहारिया (दिल्ली), आदित अमरनाथ (कर्नाटक), जिज्ञशामन हजारिका (आसाम), स्कंधा राव (कर्नाटक).
मुली – चांदणी श्रीनिवासन (तामिळनाडू), रुमा गायकैवारी (महाराष्ट्र), परी चव्हाण (महाराष्ट्र), रिया सचदेवा (दिल्ली), सौम्या रोंडे (तेलंगणा), खुशी शर्मा (महाराष्ट्र), सोनल पाटील (महाराष्ट्र), रिद्धी पोका (आंध्रप्रदेश).