एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट स्पर्धा
पुणे – टीम वन आर्किटोक्ट संघाने बुरहान प्रायव्हेट लिमिटेड संघाचा तर ईक्यु टेक्नोलॉजी संघाने टेट्रा पॅक संघाचा पराभव करत येथे होत असलेल्या ई2डी स्पोर्टस यांच्या तर्फे आयोजित एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत साखळी फेरीतुन उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
ई2डी क्रिकेट मैदान, लवळे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सचिन साठोडच्या दमदार 93 धावांच्या बळावर टीम वन आर्किटोक्ट संघाने बुरहान प्रायव्हेट लिमिटेड संघाचा 58 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना सचिन साठोडच्या 93 व निशांत नगरकरच्या 86 धावांसह टीम वन आर्किटोक्ट संघाने 20 षटकात 3 बाद 212 धावांचा डोंगर रचला. 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनिरूध्द अंबुलकरच्या अचूक गोलंदाजीने बुरहान प्रायव्हेट लिमिटेड संघाचा डाव 20 षटकात 8 बाद 154 धावांत रोखला व संघाला विजय मिळवून दिला.46 चेंडूत 93धावा करणारा सचिन साठोड सामनावीर ठरला.
तर, दुसऱ्या लढतीत रोहन पाटीलच्या 46 धावांच्या जोरावर ईक्यु टेक्नोलॉजी संघाने टेट्रा पॅक संघाचा 6 धावांनी पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना ईक्यु टेक्नोलॉजी संघाने 18.3 षटकात सर्वाबाद 120 धावा केल्या. 120 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गणेश चांदगुडे व गौरव पोलेकर यांच्या अचूक गोलंदाजीपुढे टेट्रा पॅक संघ 20 षटकात 7 बाद 114 धावांत गारद झाला. रोहन पाटील सामनावीर ठरला.