कराड – विरवडे (ता. कराड) येथे दोन महिन्यांपूर्वी तमाशावेळी संशयितांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या स्वप्निल शिरतोडे या युवकाच्या खूनाच्या गुन्ह्यात शहर पोलिसांनी चार संशयितांना शुकावारी सायंकाळी ाजशताफीने अटक केली. शाजनवारी चारही संशाजयतांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अक्षय रामचंद्र चव्हाण, रोहित किसन आडके, रोहन भरत आडके (तिघेही रा. तुपारी, ता. पलूस) व सूरज गणेश कोरडे (रा. ताकारी, ता. पलूस) अशी पोलीस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यापूर्वी बाबरमाची (ता. कराड) येथील स्वप्निल जयवंत शिरतोडे (वय 21) या युवकास अपघातात जखमी असल्याचे सांगून त्याचा गावातील मित्र विशाल विष्णू शिरतोडे याने येथील रूग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान, उपचार सुरू असताना 3 मे रोजी रात्री स्वप्निलचा मृत्यू झाला. स्वप्निलला विरवडे गावच्या यात्रेनिमित्त 17 फेब्रुवारी 2019 रोजी आयोजित तमाशावेळी जबर मारहाण झाल्याने तो जखमी झाला होता. विशाल याने स्वप्निलला रूग्णालयात दाखल करताना तो दुचाकीवरून घसरून पडल्याने जखमी झाल्याचे कारण सांगितले होते. दरम्यान, धाडस दाखवून विशाल याने अखेर घडलेला प्रकार स्वप्निलचे कुटुंबीय व पोलिसांना सांगितला. त्यामुळे पोलिसांनी विशाल याची फिर्याद नोंद करून स्वप्निलच्या खूनप्रकरणी अक्षय चव्हाण याच्यासह ताकारी, तुपारी येथील पाच संशयीतांवर गुन्हा नोंद केला होता.
या गुन्ह्यातील संशयीतांचा पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून कसून शोध घेण्यात येत होता. मात्र संशयीत पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर शुक्रवारी सायंकाळी कराड शहर पोलिसांनी ताकारी, तुपारी येथे सापळा रचून या गुन्ह्यातील अक्षय चव्हाण, रोहित आडके, रोहन आडके व सूरज गणेश कोरडे या चार संशयितांना शिताफीने अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता 15 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आहे. आजधक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जोजतराम पाटील करत आहेत.