नवी दिल्ली – दिल्लीत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या एक दिवस आधीच भाजपाने काँग्रेसला झटका दिला आहे. दिल्ली सरकारमध्ये मंत्रीपद भूषविलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजकुमार चौहान यांनी कमळ हाती घेत भाजपात प्रवेश केला आहे. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उपस्थित राजकुमार चौहान यांनी भाजपात प्रवेश केला.
Former Delhi minister Raj Kumar Chauhan joins BJP in presence of Delhi BJP Chief Manoj Tiwari pic.twitter.com/3qU5TAuzui
— ANI (@ANI) May 11, 2019
दरम्यान, राजकुमार चौहान हे काँग्रेसने तिकिट न दिल्याने नाराज होते. त्यांनी पक्षाकडून पश्चिम दिल्लीतून तिकिटाची मागणी केली होती, मात्र काँग्रेस पक्षाने राजेश लिलोठिया यांना लोकसभा निवडणुकीच तिकिट दिले. तिकिट कापल्यानंतर राजकुमार यांच्या समर्थकांनी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानासमोर प्रदर्शन देखील केले होते.