पुणे – मेट्रो क्रिकेट ऍकॅडमी आणि रांजणे क्रिकेट ऍकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून येथे होत असलेल्या स्टेडियम क्रिकेट करंडक अजिंक्यपद’ स्पर्धेच्या 12 आणि 14 वर्षाखालील गटात आगेकूच केली.
12 वर्षाखालील गटाच्या सामन्यात श्रीसंत खोदाडे याच्या गोलंदाजीच्या जोरावर मेट्रो क्रिकेट ऍकॅडमीने राजपुत क्रिकेट ऍकॅडमीचा 36 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना मेट्रो क्रिकेट ऍकॅडमीने 26 षटकात 6 गडी गमावून 157 धावा केल्या. श्रीसय सिंग (24 धावा), पृथ्वीराज टिंगरे (38 धावा) आणि विवान दोशी (21 धावा) यांनी संघाला दिडशे धावांचा टप्पा गाठून दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना राजपुत क्रिकेट ऍकॅडमीने 26 षटकात 5 गडी गमावून 121 धावा केल्या.
राजपुत संघाकडून सर्वेश जाधव याने 54 धावांची खेळी केली. पण दुसर्या बाजून त्याला कोणी साथ देऊ नाही शकले. मेट्रो संघाच्या श्रीसंत खोदाडे याने 6 षटकात 22 धावात 2 गडी बाद करून चमकदार गोलंदाजी केली. 14 वर्षाखालील गटाच्या सामन्यात रूचिर सुकथनकर याच्या नाबाद 47 धावांच्या जोरावर रांजणे क्रिकेट ऍकॅडमी संघाने राजपुत क्रिकेट ऍकॅडमीचा 31 धावांनी पराभव केला. रांजणे संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 21 षटकात 2 गडी गमावून 118 धावा केल्या.
रूचिर सुकथनकर याच्या नाबाद 47 धावा व रचित व्होरा याच्या नाबाद 18 धावा यांच्या खेळीमुळे संघाने शंभर धावांचा टप्पा गाठला. या आव्हानाला उत्तर देताना राजपुत क्रिकेट ऍकॅडमीचा डाव 21 षटकात व 87 धावांवर संपुष्टात आला. रांजणे संघाच्या ओम कानडे (2-5), नयन सांगवी (2-13), यश शेतझ्या (2-7) व रूचिर सुकथनकर (1-13) यांच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर संघाचा विजय सुकर केला.
सविस्तर निकाल – 12 वर्षाखालील गट – मेट्रो क्रिकेट ऍकॅडमी ः 26 षटकांत 6 बाद 157 (श्रीसय सिंग 24, पृथ्वीराज टिंगरे 38, विवान दोशी 21, देवाशिष बापट 24-2) वि.वि. राजपुत क्रिकेट ऍकॅडमी ः 26 षटकांत 5 बाद 121 (सर्वेश जाधव 54, अतिरिक्त धावा 45, श्रीसंत खोदाडे 2-22, अभिनव मिश्रा 1-14), सामनावीरः श्रीसंत खोदाडे.
14 वर्षाखालील गट – रांजणे क्रिकेट ऍकॅडमी ः 21 षटकांत 2 बाद 118 (रूचिर सुकथनकर नाबाद 47, रचित व्होरा नाबाद 18, कृष्णा कदम 1-26) वि.वि. राजपुत क्रिकेट ऍकॅडमी ः 21 षटकांत सर्वबाद 87 (आयुष चव्हाण नाबाद 17, यश कटारीया 12, ओम कानडे 2-5, नयन सांगवी 2-13, यश शेतझ्या 2-7, रूचिर सुकथनकर 1-13); सामनावीरः रूचिर सुकथनकर.