मुंबई – क्रुडचे दर घसरत असल्यामुळे भारतीय रुपयाला चांगलाच आधार मिळत आहे. शुक्रवारी रुपयाच्या मूल्यात पंधरा पैशांची वाढ झाल्याचे दिसून आले.
चार दिवसांपासून रुपयाच्या मूल्यात वाढ होत आहे. सरलेल्या आठवड्यात रुपयाच्या मूल्यात तब्बल 80 पैशाची वाढ झाली आहे. इतर वेगाने विकसित होणाऱ्या देशापेक्षा भारतीय रुपयाचे मूल्य अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी रुपयाच्या मूल्यात 15 पैसे वाढवून दिवसाअखेर रुपयाचे मूल्य 69.22 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले होते.