बीड – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईतील वंजारी वसतीगृहाच्या मैदाानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या प्रचार सभेत नाव न घेता विनायक मेटेंना इशारा दिला. ‘गोपीनाथ मुंडेंशिवाय भाजप अपूर्ण आहे. त्यामुळे जो गोपीनाथ मुंडेंसोबत नाही, तो भाजपमध्ये राहू शकत नाही आणि जो भाजपसोबत आहे त्याला गोपीनाथ मुंडेंसोबत रहावंच लागेल. जे आले त्यांना घेवून आणि जे आले नाहीत त्यांच्या शिवाय आम्ही विजयाकडे वाटचाल करणार.’
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. वास्तविक शिवसंग्राम हा पक्ष महायुतीचा घटकपक्ष आहे. असं असताना बीडमध्ये मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. वास्तविक शिवसंग्राम हा पक्ष महायुतीचा घटकपक्ष आहे. असं असताना बीडमध्ये मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.
Some more glimpses of support at Ambejogai in Beed district.#ModiHiAayega pic.twitter.com/e5u7ntXqQK
— Chowkidar Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 12, 2019