पुणे – संगणक अभियंत्याचे सॅलरी सेव्हींग अकाऊंट हॅक करून खात्यातून तब्बल 24 लाख 98 हजार रुपये काढून घेण्यात आले. याप्रकरणी अज्ञात बॅंकेच्या खातेदारांविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक पहाटे अवघ्या दोन तासात ऑनलाइन पध्दतीने करण्यात आली.
फिर्यादी यांचे एका नामांकीत बॅंकेत सॅलरी सेव्हींग अकाऊंट आहे. हे खाते अज्ञात व्यक्तीने हॅक केले. अवघ्या दोन तासात त्यांच्या खात्यातील 24 लाख 98 हजार विविध बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले. हे पैसे बंगळुरु आणि गुजरात येथील विविध पाच व्यक्तींच्या खात्यात वर्ग झाल्याने निष्पन्न झाले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिनगारे करत आहेत.