उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा कुमारी मायावती यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मायावती यांनी उत्तर प्रदेशातील आपल्या एका जाहीर सभेमध्ये मुस्लिमांनी सपा-बसपा आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन केले होते. मायावतींच्या याचं आव्हानावरून आज योगी आदित्यनाथ यांनी आज बसपा प्रमुखांवर निशाणा साधला असून ते म्हणतात, ‘जर मायावती केवळ मुस्लिम समुदायाच्या लोकांनाच सपा-बसपा आघाडीसाठी मतं मागत असतील तर दुसऱ्या समुदायाचे लोक देखील आपली मतं कुणाला द्यावी हे ठरवतील. मात्र मायावतींकडून करण्यात आलेले वक्तव्य हे काशीरामजी आणि आंबेडकरांचा अपमान आहे.’
UP CM on Mayawati appeals to Muslims to vote for BSP-SP: Mayawati ji ke dwara is prakar ka sambodhan… Kanshiram ji aur Ambedkar ji ka isse bada doosra apmaan nahi ho sakta. Agar unhe keval Muslim vote chahiye to swabhavik roop se doosra vote bhi tay kar lega ki kahan jana hai pic.twitter.com/iD8mJ9t6pG
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 8, 2019