पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयांमध्ये रेबिजच्या लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. महापालिकेने रुग्णांच्या मागणीची दखल घेवून तात्काळ रेबीज लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सचिन गोडांबे यांनी केली.याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
महापालिकेच्या हद्दीतील भोसरी परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या परिसरात नागरिकांवर कुत्र्यांकडून हल्ले केले जात आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिकांचा ते चावा घेत आहेत. मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांचा चावा काढण्याच्या प्रकारात वाढ झाल्यामुळे रेबीज लसीची मागणी वाढली आहे. त्यामुळे रेबीज लस उपलब्ध करून द्यावी.