मायावतींकडून काशीरामजी आणि आंबेडकरांचा अपमान : योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा कुमारी मायावती यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मायावती यांनी उत्तर प्रदेशातील आपल्या एका जाहीर सभेमध्ये मुस्लिमांनी सपा-बसपा आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन केले होते. मायावतींच्या याचं आव्हानावरून आज योगी आदित्यनाथ यांनी आज बसपा प्रमुखांवर निशाणा साधला असून ते म्हणतात, ‘जर मायावती केवळ मुस्लिम समुदायाच्या लोकांनाच सपा-बसपा आघाडीसाठी मतं मागत असतील तर दुसऱ्या समुदायाचे लोक देखील आपली मतं कुणाला द्यावी हे ठरवतील. मात्र मायावतींकडून करण्यात आलेले वक्तव्य हे काशीरामजी आणि आंबेडकरांचा अपमान आहे.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.