नगर: शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आ.भाऊसाहेब कांबळे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला. शिर्डी मतदारसंघातील आजपासून प्रक्रिया सुरु झाली असून कांबळे यांनी पहिल्याच दिवशी अर्ज भरला. पहिल्या दिवशी 25 जणांनी 42 अर्ज नेले.
पहिल्या दिवशी अर्ज नेलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. (कंसात अर्जांची संख्या), शरद बापू गुंजाळ यांनी भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी (4), सतिश पंढरीनाथ शिंदे यांनी सदाशिव लोखंडे यांच्यासाठी (3), बाळासाहेब एकनाथ सोनवणे यांनी भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्यासाठी (4 ), नानासाहेब भानुदास तुपे यांनी ऍड. संतोष कांबळे यांच्यासाठी (4), किशोर दादू वाघमारे यांनी अरुण साबळे यांच्यासाठी (1), बापू पाराजी रणधिर (2), मच्छिंद्र आनंदा नागरे यांनी सुधाकर प्रभाकर रोहम यांच्यासाठी (1), किशोर दादू वाघमारे (1), बहिरीनाथ तुकाराम वाकळे यांनी ऍड. बन्सी भाऊराव सातपुते यांच्यासाठी (4), गोरख सिताराम भारुड (2), दिलीप गोपीचंद बडधे यांनी सोपान तुकाराम औचित्य यांच्यासाठी (2), सुनिल विनायक कांबळे (1), शिमोन ठकाजी जगताप (1), किरण शेबाजी शेजवळ (1), माधव सखाराम त्रिभुवन (1), सुरेश एकनाथ जगधने (1), गणपत मच्छिंद्र मोरे (1), दिपक प्रमोद क्षेत्रे भिंगार यांनी अशोक रामचंद्र गायकवाड (1), डॉ. पांडूरंग बाबासाहेब बुरुटे (1), रोहम योसेफ आरसुड (1), डॉ. विजयकुमार पोपटराव पोटे (1), राहुल हरिभक्त (1), आशिष युवराज बागुल (1), युवराज धनाजी बागुल (1) लक्ष्मण काशीनाथ साबळे (1).