सुजय विखे पाटील यांच्याकडे आहे ‘इतकी’ संप्पती

अहमदनगर – भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ११ कोटी १७ लाख, तर पत्नी धनश्री यांच्याकडे ५ कोटी ७ लाखांची मालमत्ता असल्याची माहिती दिली आहे.

तसेच डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या नावावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसल्याचे प्रतिज्ञापत्रात दिले आहे. ४ कोटी ९१ लाखांची जंगम आणि ६ कोटी २५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता, तर १ लाख १६ हजार २९५ रुपयांची रोकड, त्याचबरोबर पत्नीकडे १ लाख ३७ हजार ४८५ रुपये रोकड असून त्यांच्यावर प्रवरा बँकेचे २६ लाख २३ हजारांचे कर्ज असल्याची माहिती त्यांनी अर्जामध्ये दिली आहे. तसेच विखे यांचे नाव शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदवले गेले असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.

अहमदनगर लोकसभेसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपकडून आगामी लोकसभा निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप मैदानात आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.