कान्हे (वार्ताहर) – कान्हे येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज व हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीमध्ये शंभरहून अधिक बैलगाडा धावल्या. तर, मावळ तालुक्यातील दत्ताशेठ गबळु साबळे व बंडाशेठ मधुकर पडवळ यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला.
यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मावळ तालुका पंचक्रोशीतील बैलगाडा शौकीन व बैलगाडा मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैलगाडी शर्यतीचे आयोजन समस्त ग्रामस्थ मंडळी कान्हे व बैलगाडा संघटना कान्हे यांनी केले होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक 14.43 से मावळ तालुक्यातील दत्ताशेठ गबळू साबळे व बंडाशेठ मधुकर पडवळ यांनी, द्वितीय क्रमांक 14.57 से स्वामीनाना मधुकर गायकवाड व दीपक नारायण काशीकर तर, तृतीय क्रमांक14.64 से देवराम शिवराम गायकवाड, अमृता माऊली शितोळे व चतुर्थ क्रमांक 14.72 से आई ताजुबाई बैलगाडा संघटना व भैरवनाथ बैलगाडा संघटना आणि पंचवा क्रमांक14.74 शंभू भोलेनाथ टाकवे नामदेव शेठ कोंडे यांनी पटकावला.