Disha Patani Troll| बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या चित्रपटासह लुकसाठी नेहमीच चर्चेत असते. नुकताच तिचा ‘योद्धा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. दिशा पाटनी नुकताच ‘ग्राझिया यंग फॅशन अवॉर्ड्स 2024’ या शोमध्ये सहभागी झाली होती. दिशा पाटनीने या शोमध्ये तिने हटके लुक केला होता. मात्र तिच्या या लुकमुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.
या कार्यक्रमादरम्यानचा दिशा पाटनीचा या स्टायलिश ड्रेसमधील व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या नवीन ड्रेसमध्ये दिशा पाटनी खूपच अस्वस्थ दिसत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. Disha Patni Troll|
View this post on Instagram
यावरून दिशाला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. दिशा पाटनीच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘तू या ड्रेसमध्ये किती अस्वस्थ दिसत आहेस’. दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘तू असा ड्रेस का घालते?’
तर दिशा पाटनीच्या या हॉट लूकला तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे. या अवॉर्ड शोमध्ये सर्वांच्या नजरा दिशा पाटनीवरच खिळल्या होत्या. दरम्यान, यापूर्वी देखील अनेकदा दिशाला ट्रोल करण्यात आले आहे.