माद्रिद – आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान जगाच्या कानाकोपऱ्यात विविध कारणांसाठी वापरले जात आहे आता एक स्पॅनिश टेलिव्हिजनवर याच तंत्रज्ञानाचा वापर करून एका सूत्रसंचालकाची निर्मिती करण्यात आली असून एका रियालिटी शोची जबाबदारी या महिला एआय सूत्रसंचालकावर देण्यात आली आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही एआय सूत्रसंचालक निर्माण करण्यापूर्वी या टेलिव्हिजनने प्रेक्षकांकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या होत्या प्रेक्षकांनी गेल्या काही महिन्यामध्ये त्यांच्या ज्या अपेक्षा टेलिव्हिजन लपर्यंत पोहोचवल्या होत्या त्याच्या आधारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून या सूत्रसंचालकाची निर्मिती करण्यात आली आहे.
स्पेन मधील मीडियासेट स्पेन या आघाडीच्या टेलिव्हिजन कंपनीच्या बी अ लायन या उप कंपनीने अलबा रेनाय नावाच्या या महिला सूत्रसंचालकाची निर्मिती केली आहे या टेलिव्हिजनवरील सरव्हायव्हर या प्रख्यात रियालिटी शोचे सूत्रसंचालक करणार आहे या टेलिव्हिजन कंपनीने अलबाचे दर्शन घडवताच काही क्षणातच दहा हजार लोकांनी तिला लाईक केले हजारो तरुणांच्या अपेक्षांच्या आधारे हा डिजिटल अवतार तयार करण्यात आला असल्याने तो लवकरच लोकप्रिय होईल अशी आशा या टेलिव्हिजन चॅनेलला आहे अशाप्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे बेरोजगारी वाढणार नसून उलट अनेकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.