Indian Premier League 2024 Live Cricket Score, SRH vs MI : आज आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात, पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ 2016 च्या चॅम्पियन संघ सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर 7.30 वा सुरू होणार आहे.
दोन्ही संघ मोसमातील पहिल्या विजयाची वाट पाहत आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. त्याचवेळी कोलकाता नाईट रायडर्सने रोमहर्षक सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. मात्र, दोन्ही संघ मोसमातील पहिला विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
तत्पूर्वी, आयपीएलच्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याने सांगितले की, ल्यूक वुड या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसणार नाही. तर क्वेना माफाका आज आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबादच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. मार्को जॉन्सनच्या जागी ट्रेव्हिस हेडचा समावेश करण्यात आला आहे तर टी नटराजन दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यांच्या जागी जयदेव उनाडकट याला संधी मिळाली आहे.
🚨 Toss Update 🚨
Mumbai Indians win the toss and elect to bowl against Sunrisers Hyderabad.
Follow the match ▶️https://t.co/oi6mgyCP5s #TATAIPL | #SRHvMI pic.twitter.com/DEZZk3HCHh
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2024
SRH vs MI : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (WK), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.
Your first home 1️⃣1️⃣ of the season is HERE, #OrangeArmy!
We bat first at Uppal 👊🔥#PlayWithFire #SRHvMI @Dream11 pic.twitter.com/C8FVUYPaWL
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 27, 2024
इम्पॅक्ट खेळाडू : नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव.
मुंबई इंडियन्स : इशान किशन (Wk), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका.
It’s a Kwena Maphaka debut!
Here’s the XI for #SRHvMI. Let’s get that 𝐖, boys 🔥#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @Dream11 pic.twitter.com/RVPXWAOWDZ
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2024
इम्पॅक्ट खेळाडू : देवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, विष्णू विनोद, नेहल वढेरा.
दरम्यान, आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद 21 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने 12, तर सनरायझर्स हैदराबादने 9 सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादची सर्वोत्तम धावसंख्या 200 धावा आहे. तर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सची सर्वोच्च धावसंख्या 235 धावांची आहे.