Aman Gupta Success Story। देशात सध्या शार्क टॅंक चा तिसरा सीजन सुरु आहे. यातील एका उद्योगपतीची वेळोवेळी चर्चा होते. ते म्हणजे boat कंपनीचा अमन गुप्ता याची. अमान गुप्ताची boat नावाची कंपनी इअर फोन्ससह इतर सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स बनवते. अल्पावधीतच या कंपनीची उत्पादने बाजारात लोकप्रिय झाली. यासह कंपनीने लोकांचे प्रेम आणि विश्वास जिंकला आहे. आज ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्सच्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत सामील झालीय . मात्र या कंपनीचे सह-संस्थापक अमन गुप्ता यांचा आजपर्यंतचा प्रवास देखील काही सहज सोपा झाला नाही. आजच्या success story च्या भागात आज अमन गुप्ताच्या प्रवासाची माहिती आपण जाणून घेऊ…
अमन गुप्ताचा जन्म दिल्लीत Aman Gupta Success Story।
अमन गुप्ता हे बोट कंपनीचे सह-संस्थापक आहेत. जे सध्या सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘शार्क टँक इंडिया सीझन 3’ मध्ये न्यायाधीश म्हणून दिसत आहेत. अमनचा जन्म 1984 मध्ये दिल्लीत झाला होता. त्यांनी दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. त्याठिकाणी त्यांनी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतले. तेव्हापासून त्यांनी एक यशस्वी उद्योगपती होण्याची इच्छा बाळगली. ज्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली.
5 स्टार्टअप अयशस्वी Aman Gupta Success Story।
बोट कंपनी सुरू करण्यापूर्वी त्याने आणखी 5 कंपन्या सुरू केल्या होत्या, ज्या फ्लॉप होत्या, पण त्याच्या जिद्दीमुळे तो आज देशातील पहिल्या क्रमांकाचा स्टार्टअप बनला आहे. या काळात त्यांना खूप कठीण काळातून जावे लागले कारण त्या काळात कोणतीही बँक त्यांना कर्ज द्यायला तयार नव्हती. त्यानंतरही त्याने हार मानली नाही आणि स्पर्धेच्या या दुनियेत त्याला स्वत:वर विश्वास होता. बोट कंपनीही सुरू केली. यावेळी त्यांनी उत्पादनाच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले. यानंतर हळूहळू सर्व काही योग्य दिशेने जाऊ लागले. कंपनीचे ऑफिस कॉलेजच्या कॅन्टीनसारखे , पण त्याचा बिझनेस करोडोंचा आहे.
अमन गुप्ता यांचे नेटवर्क
अमन गुप्ताच्या नेटवर्कबद्दल बोलायचे झाले तर तो 700 कोटींचा मालक आहे. बोट कंपनीशिवाय त्यांनी आतापर्यंत ३० वेगवेगळ्या स्टार्टअप्समध्ये पैसे गुंतवले आहेत. सध्या ते दक्षिण दिल्लीतील त्यांच्या घरात राहतात. ज्याची किंमत आज 8 ते 10 कोटी रुपये आहे. प्राप्त माहितीनुसार, 55 लाख रुपयांची BMW X1 व्यतिरिक्त, अमनकडे 1.70 कोटी रुपयांची BMW 7 सीरीज देखील आहे.