हैद्राबाद– सर्वसाधारणपणे कोणत्याही विक्रम पुस्तकात जेव्हा एखाद्या विक्रमाची नोंद होती तेव्हा तो विक्रम करणाऱ्या व्यक्तीला त्याची जाणीव असते. पण जेव्हा हा विक्रम करणाऱ्या व्यक्तीलाच आपल्या विक्रमाची जाणीव नसते आणि त्या विक्रमाची नोंद घेतली जाते. तेव्हा मात्र ती गोष्ट वेगळी ठरते. आंध्र प्रदेशमधल्या चार महिन्यांच्या एका बालकाबाबत अशी घटना घडली आहे.
कैवल्य नावाच्या चार महिन्याच्या बालिकाचा समावेश नोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश मधील नदीगामा जिल्ह्यातील कैवल्य नावाची ही लहान बालिका 120 पेक्षा जास्त वस्तू किंवा त्यांचे चित्र ओळखण्याचा पराक्रम करते. याबाबतचा व्हिडिओ तिच्या आई-वडिलांनी नोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे पाठवल्यावर त्यांनी त्याची दखल घेतली आणि या विक्रमाची पुस्तकात नोंद करण्यात आली. जो व्हिडिओ नोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडे पाठवण्यात आला होता. त्यामध्ये विविध प्रकारची 120 कार्ड दाखवण्यात आली होती आणि त्या कार्ड वरील छायाचित्रे तिने सहजपणे ओळखली.
त्यामध्ये 12 फळे 27 फुले 27 फळे आणि 27 पक्षी 27 भाज्या अशी चित्रे होती कैवल्याच्या आईचे नाव हेमा असून तिला अगदी लहान वयात कैवल्याच्या या विशेष गुणांची माहिती झाली होती. त्यामुळे त्यांनी तिचीही गुणवत्ता अधिक विकसित केली जेव्हा ती 100 पेक्षा जास्त वस्तू ओळखायला लागली. तेव्हा त्यांनी त्याचा व्हिडिओ करून नोबल रेकॉर्ड कंपनीकडे पाठवला कंपनीने व्हिडिओची दखल घेऊन तिला एक विशेष प्रमाणपत्र बहाल केले असून त्यामध्ये विक्रम पुस्तकांमधील सर्वात लहान व्यक्ती असा उल्लेख करण्यात आला आहे.