U.P. Yoddhas vs Jaipur Pink Panthers, Pro Kabaddi League (कोलकाता) – प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवारी झालेल्या लढतीत जयपुर पिंक पॅंथर्स संघाने युपी योद्धाज संघाचा ६७-३० असा दणदणीत पराभव केला. या विजयाच्या जोरावर जयपुर संघाने यंदाच्या मोसमातील या स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखले आहे.
सामन्याचे पहिले सत्र सुरु झाल्यावर युपी संघाने आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर उर्वरीत वेळ जयपुरनेच नियंत्रण राखले. या सत्राच्या अखेरीस जयपूरचा संघ २३-११ असा आघाडीवर होता. जयपुरचा स्टार खेळाडू अर्जुन देशवाल व सुनील कुमार यांनी युपी संघाच्या खेळाडूंवर दडपण टाकत सर्वोत्तम पकडी केल्या. युपीकडून हितेशने थोडीफार चमक दाखवली मात्र, अन्य खेळाडूंकडून यश मिळत नव्हते.
Records shattered & a semi-final spot confirmed ✅
Arjun Deshwal’s 2️⃣0️⃣ points 🤯 inspires Jaipur Pink Panthers to a 37-point victory over U.P. Yoddhas 🔥#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #UPvJPP #UPYoddhas #JaipurPinkPanthers pic.twitter.com/ywIRLgkM1q
— ProKabaddi (@ProKabaddi) February 12, 2024
दुसरे सत्र तर युपी संघासाठी अत्यंत निराशाजनक ठरले. जयपूरच्या देशवालने एकहाती वर्चस्व राखताना तब्बल २० गुणांची कमाई केली. त्याला सुनील कुमार व अंकुशने सुरेख साथ दिली. युपी संघाच्या गगन गौडाने अखेरच्या काही मिनिटांत तुल्यबळ लढत दिली. मात्र, ते इतके पिछाडीवर पडले होते की त्यांना सामन्यात परतणेच शक्य झाले नाही. हा सामना जयपुरने ६७-३० अशी प्रचंड फरकाने जिंकला.
#PKLSeason10 (#CHEvPUN Match 115) : मोठ्या विजयासह पुणेरी पलटणचा उपांत्य फेरीत प्रवेश…
जयपूर पिंक पॅंथर्स संघाने या पूर्वीच बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केल असल्याने हा सामना तसा औपचारीकच होता. तरीही त्यांनी अत्यंत गांभीर्याने खेळ केला. स्पर्धेच्या गुणतालिकेत जयपुरचा संघ ७७ गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. पुणेरी पलटण संघाने यंदाच्या स्पर्धेत ८१ गुणांसह अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर युपीचा संघ गुणतालिकेत ११ व्या स्थानावर आहे. यंदाच्या मोसमातील युपी संघाची ही आतापर्यंतची अत्यंत सुमार कामगिरी आहे.