पुणे – पुणे आणि शिरूर लोकसभा मतदार संघात सोमवारी (दि.१३) मतदान आहे. त्यामुळे या दिवशी मार्केट यार्डातील मुख्य बाजारातील फळ, भाजीपाला, गुळ-भुसार, केळी, फुलबाजार, पान बाजार, पेट्रोल पंप, वजनकाटा विभाग आणि मोशी, खडकी, मांजरी, उत्तमनगर येथील उपबाजार बंद राहणार आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये, तसेच व्यापाऱ्यांनी खरेदीस येऊ नये, असे आवाहन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे. सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे.