पिंपरी, (प्रतिनिधी) – शिवसेनेच्या महिलासेना पदाधिकारी यांचा शिवदुर्गा संवाद दौरा वाल्हेकरवाडी, चिंचवड, येथे संपन्न झाला. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, यांनी सर्वांचे स्वागत करून आगामी लोकसभा निवडणूक संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेना पक्षनेत्या मीना कांबळी, सचिव ॲड मनीषा कायंदे, शितल म्हात्रे, उपनेते इरफान सय्यद, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये घेतलेल्या निर्णयांचा, केलेल्या विकास कामांची तसेच खासदार बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांची माहिती दिली.
यावेळी मीना कांबळी म्हणाल्या की, शिंदे सरकारने महिलांना एसटी प्रवास दरामध्ये पन्नास टक्के सूट दिली. यामुळे महिलांना फायदा ही झाला आणि तोट्यातील बस फायद्यात धावत आहे. महिलांसाठी शासनाच्या सर्व सुविधा सामन्यांपर्यंत पोहचावा, असे आवाहन केले.
यावेळी ॲड कायंदे म्हणाल्या कि, महाराष्ट्राला एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जनतेमध्ये फिरणारे मुख्यमंत्री लाभले. शिंदे सरकार सध्या महिलांसाठी खूप महत्त्वाचे निर्णय राबवत आहे. नुकतेच ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा मंत्र चंद्रकांत पाटील यांनी केली. यासाठी १ हजार कोटींची तरतूद केली आहे.
याप्रसंगी पूजा रावेतकर, माजी नगरसेविका विमल जगताप, शहर संघटिका सरिता साने, जिल्हा संघटना शैला पाचपुते, पिंपरी विधानसभा संघटिका शारदा वाघमोडे, देहू शहरप्रमुख सुनील हगवणे, रितू कांबळे, पोर्णिमा अमराव, सुनिता शर्मा, सुवर्णा कुटे, दिलीप पांढरकर, प्राजक्ता पांढरकर, संगीता कदम, अश्विनी बागुल, डोईफोडे, ढोबाळे, शेलार , बाळकृष्ण चिले, केशव सरोदे, हर्षवर्धन पांढरकर, व असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या.