Jaipur Pink Panthers vs Patna Pirates, Pro Kabaddi League (New Delhi) :- प्रो-कबड्डी लीगमध्ये सोमवारी झालेल्या लढतीत पाटणा पायरट्स संघाने बलाढ्य जयपूर संघाचा 36-33 असा पराभव केला. यंदाच्या स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या जयपुरला पाटणा संघाने जबरदस्त लढत देत विजय मिळवला. या सामन्यातील पहिले सत्र जयपुरने गाजवले तर दुसर्या सत्रात पाटणा संघाने तुफानी कामगिरी करत सामन्यात यशस्वी पुनरागमन केले.
🚨 𝐏𝐢𝐫𝐚𝐭𝐞𝐬 𝐞𝐧𝐝 𝐏𝐚𝐧𝐭𝐡𝐞𝐫𝐬’ 𝐮𝐧𝐛𝐞𝐚𝐭𝐞𝐧 𝐬𝐭𝐫𝐞𝐚𝐤 🚨
Sachin and Sudhakar lead Patna Pirates to their 9️⃣th win of #PKLSeason10!#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #JPPvPAT #JaipurPinkPanthers #PatnaPirates pic.twitter.com/kWromQcc94
— ProKabaddi (@ProKabaddi) February 5, 2024
या सामन्यातील पहिले सत्र जयपुर संघाच्याच वर्चस्वाचे ठरले. त्यांनी पहिले सत्र संपले तेव्हा पाटणा पायरट्सवर ४ गुणांची महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. जयपुरचा स्टार खेळाडू अर्जुन देशवालने जोरदार मुसंडी मारताना पाटणा संघाच्या खेळाडूंच्या सर्वोत्तम पकडी केल्या. त्याला कर्णधार सुनील कुमारनेही सुरेख साथ दिली. जयपूर संघाने यंदाच्या मोसमातील स्पर्धेत या सामन्यापूर्वीच प्लेऑफमध्ये प्रवेश केलेला असल्याने हा सामना त्यांच्यासाठी केवळ एक सरावाचाच भाग बनला होता.
पाटणा संघाचा रेडर कर्णधार सचिनने ५ गुणांची कमाई करत थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या एम. सुधाकरनेही जयपुरला चांगले आव्हान दिले मात्र, पहिल्या सत्राच्या अखेरीस त्यांना पिछाडी भरून काढण्यात यश आले नाही. जयपुरचा अर्जुन देशवाल गेल्या मोसमातील सर्वोत्तम रेडर ठरला होता. तो यंदाही त्याच शर्यतीत आहे. त्याचे १७ सामनयांतून आतापर्यंत १९१ रेड गुण झाले आहेत. जयपुर संघाने यंदाच्या स्पर्धेत ७१ गुणांसह गुमतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे.
दुसरे सत्र सुरु झाल्यावर पाटणा संघाने पहिल्या दोनच मिनिटांत पिछाडी भरून काढली व १८-१८ अशी बरोबरी केली. तसेच त्यानंतरच्याच मिनिटाला त्यांनी चक्क आघाडीही घेतली व जयपूरवर दडपण टाकण्याचाही प्रयत्न केला. याच कालावधीत दोन्ही संघांचे समसमान गुण होत होते व सामना अतिशय रंगतदार स्थितीत आला होता. त्यानंतर सामन्यावरील पकड पाटणा संघाने निसटू दिली नाही व जयपुरला धक्का देत सनसनाटी विजय मिळवला. त्यांच्या स्टार खेळाडू सचिन व सहकारी एम. सुधाकर विजयाचा शिल्पकार ठरले.