पुणे – पुणे जिल्हा बुद्धीबळ सर्कल (पीडीसीसी) यांच्या वतीने आयोजित पीडीसीसी जिल्हा ७,९,११,१३, १७ वर्षाखालील निवड बुद्धीबळ स्पर्धेत जिल्ह्यातून ५२८ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा कर्वे रोड येथील अश्वमेध हॉल आणि श्री गणेश सभागृह या ठिकाणी १४ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत रंगणार आहे.
पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे यांनी सांगितले की, स्पर्धेला अमानोरा आणि ट्रुस्पेस यांचे प्रायोजकत्व लाभले असून एकूण ४०,००० रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच, ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने सात किंवा आठ फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे.
Solaris Cup National Tennis Tournament : नितीन, अजय, किशोर यांना दुहेरी मुकूट…
स्पर्धेत अनुष्का कुतवळ(१४९५), विरेश शरणार्थी(१८१२), निहिरा कौल(१४०६), आर्यन करमळकर(१५१२), आदित्य जोशी(१५६४), इरा बोहरा(१०४१) यांसारखे मानांकित खेळाडू आपले कौशल पणाला लावणार आहेत. स्पर्धेसाठी आयए विनिता श्रोत्री चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत.