पुणे – नुकत्याच पार पडलेल्या पुणे जिल्हा परिषद आंतर शालेय क्रिकेट क्रीडा स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटात अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल क्रिकेट संघाने ट्रिपल सुवर्णपदक जिंकून एक आगळावेगळा पराक्रम आपल्या नावावर नोंदवण्याचा प्रयत्न केला.
प्रशालेच्या क्रिकेट संघाने ‘सुपर सेवन क्रिकेट, टेनिसबॉल क्रिकेट, मॉंटेक्स बॉल क्रिकेट या तीनही प्रकारात सुवर्णपदक जिंकून पुणे विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या निर्भेळ यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी ए इनामदार यांनी संघाचे कौतुक केले.
प्रशालेचे प्राचार्य राज मुजावर यांनी संघाचे कौतुक करून पुढील फेरीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक मजिद सय्यद, खालिद बागवान, अमजद पठाण यांचे या संघाला मार्गदर्शन लाभले.