फलटण – फलटण येथे बुधवारी (दि. 10) सकाळी भरधाव मोटारसायकलची धडक बसून रस्ता ओलांडणार्या अरुण तुकाराम खटावकर (वय 73, रा. बारसकर गल्ली, शुक्रवार पेठ, फलटण) यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी, अरुण खटावकर हे बुधवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छ. शिवाजी महाराज चौक या रस्त्यावरून निघाले होते.
ते ऋतुराज हॉटेलच्या समोरून रस्ता ओलांडत असताना, भरधाव मोटारसायकलने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात खटावकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांचा मुलगा ओंकार खटावकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.