Japan Earthquake : जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत सुरु असतानाच आज उत्तर मध्य जपानमध्ये7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जपानच्या हवामान विभागाने हा भूकंप होताच त्सुनामीचा इशारा दिला आहे.
जपानच्या हवामान संस्थेने इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रीफेक्चर्सच्या किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा दिला होता. त्यानंतर पश्चिम भागात जोरदार भूकंपाचे धक्के बसले, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर परिसरातील इशिकावा, निगाता, तोयामा आणि यामागाता प्रांतातील नागरिकांना किनारी भाग लवकरात लवकर सोडण्यास सांगितले. इशिकावा येथील नोटो प्रायद्वीपजवळ समुद्रापासून १६ फुटापर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे.
NHK च्या रिपोर्टनुसार, नवीन वर्षाच्या दिवशी भूकंपाचे धक्के टोकियो आणि कांटो भागात जाणवले. इशिकावा, निगाटा, टोयामा आणि यामागाटा प्रांतांना इशिकावामधील नोटो द्वीपकल्पावरील वाजिमा बंदरावर 1.2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा आल्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आल्यानंतर किनारी भाग त्वरीत रिकामा करण्याचे आवाहन करण्यात आले.
WATCH: Tsunami waves observed along the coast of western Japan. People being urged to evacuate pic.twitter.com/sY3bdpVZVc
— BNO News (@BNONews) January 1, 2024
जपानमध्ये त्सुनामीच्या लाटा उसळू लागल्या
जपानमध्ये स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 4:21 वाजता सुनामीचा इशारा देण्यात आला. यानंतर तोयामा प्रीफेक्चरमध्ये 4:35 वाजता 80 सेंटीमीटरच्या लाटा किनारपट्टीवर आदळल्या आणि त्यानंतर 4:36 वाजता लाटा निगाता प्रांतात पोहोचल्या. यापूर्वी 28 डिसेंबरला जपानमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. जपानच्या कुरिल बेटांवर झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल एवढी होती. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, अर्ध्या तासात येथे भूकंपाचे दोन धक्के जाणवले.
🚨#BREAKING: A powerful 7.8 magnitude earthquake has hit western Japan tsunami warnings is on its way. Already waters are surging. Hope the nuclear reactors are safe this time.
— Syrian Girl 🇸🇾🎗 (@Partisangirl) January 1, 2024
भूकंपानंतर नागरिकांना काय सूचना देण्यात आल्या ?
* NHK TV ने इशारा देत सांगितले की, पाण्याचा प्रवाह 5 मीटर (16.5 फूट) पर्यंत पोहोचू शकतो आणि लोकांना शक्य तितक्या लवकर उंच जमिनीवर किंवा जवळच्या इमारतीच्या टेरेसवर धावत जावे.
* 1 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा इशिकावा प्रीफेक्चरमधील वाजिमा सिटीच्या किनारपट्टीवर आदळल्या.
* “सर्व रहिवाशांनी ताबडतोब उंच जमिनीवर जाणे आवश्यक आहे,” राष्ट्रीय प्रसारक NHK टीव्हीने सांगितले. इशिकावा प्रीफेक्चरमधील नोटो प्रदेशात भूकंप झाला.
* जपानमधील 7.6 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर पूर्व किनारपट्टीच्या काही भागांमध्ये समुद्राची पातळी वाढू शकते, असे दक्षिण कोरियाच्या हवामान संस्थेने म्हटले आहे.
* कंसाई इलेक्ट्रिक पॉवरच्या प्रवक्त्याने सांगितले की, सध्या त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये कोणतीही गंभीर स्थिती नाही. परंतु, कंपनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
* 11 मार्च 2011 रोजी ईशान्य जपानला मोठा भूकंप आणि त्सुनामी आली, शहरे उद्ध्वस्त झाली होती