Pro Kabaddi League 2023-2024 : प्रो कबड्डी लीगच्या 37 सामन्यात यूपी योद्धाजवर 30-38 अशा फरकाने विजय मिळवून गुजरातच जायंट्स ठरली. अशाप्रकारे गुजरातचा हा सात सामन्यांतील चौथा विजय तर यूपी योद्धाजचा 7 सामन्यांमधील 4 पराभव ठरला.
कांटे की टक्कर मुक़ाबले में गुजरात जायंट्स ने दर्ज की अपनी चौथी जीत 💪🚀
यूपी योद्धाज़ को 3️⃣8️⃣-3️⃣0️⃣ के बड़े अंतर से हराया 🤜💥🤛
#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #GGvUP #GujaratGiants #UPYoddhas pic.twitter.com/S2gjGOhGFH— ProKabaddi (@ProKabaddi) December 23, 2023
गुजरातकडून यासामन्यात राकेश सुंग्रोयाने 10 रेड पॉईंटसह एकूण 14 गुणांची कमाई केली. त्याच्यापाठोपाठ फजल अत्रचलीने 6 गुण घेतले. यूपीकडून सुरेंदर गिलने रेडमध्ये 9 व एकूण 13 गुणांची कमाई केली. त्याच्यासह नितीश कुमारने 6 गुण घेतले.
#PKLSeason10 (#CHEvJPP Match 36) : जयपूर पिंक पँथर्सचा तमिळ थलायवावर रोमहर्षक विजय…
दरम्यान, दुसरीकडे प्रो कबड्डी लीगच्या ३६ व्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने तमिळ थलायवासचा 25-24 असा पराभव केला. जयपूर पिंक पँथर्सचा हा चौथा विजय आहे आणि तमिळ थलायवासचा घरच्या मैदानात सलग दुसरा पराभव आहे. तमिळ थलायवाससाठी हिमांशूने रेडिंगमध्ये सर्वाधिक ८ रेड पॉइंट्स केले. बचावात एम अभिषेकने सर्वाधिक ४ टॅकल पॉइंट घेतले. जयपूर पिंक पँथर्ससाठी, अर्जुन देशवालने चढाईत सर्वाधिक ७ गुण घेतले आणि बचावात कर्णधार सुनील कुमार आणि रजा मिरबाघेरीने ४-४ टॅकल पॉइंट घेतले.