Ajit Pawar In Baramati : बारामतीतील गोविंद बागेत दरवर्षी प्रमाणे यंदा देखील दिवाळी साजरी करण्यात येत आहे. यासाठी सर्व पवार कुटुंबीय एकत्र येत असतात. मात्र यंदाच्या या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच अजित पवार यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मात्र असे असताना अजित पवार गटातील आमदारांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, असे असताना अजित पवार हे बारामतीतच असूनही तिकडे फिरकले नाहीत.
राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज गोविंदबागेत दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले असताना बारामतीत असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार तिकडे गेले नाहीत. परंतू, थोड्याच वेळात अजित पवार काटेवाडीत दिवाळीनिमित्त सजविलेले किल्ले पाहत फिरत असल्याचे दिसले आहे.
अजित पवार हे बारामतीतच असूनही तिकडे फिरकले नाहीत. त्यांनी काटेवाडीत धनी वस्तीला भेट दिली. देविदास काटे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या घरी अजित पवारांनी भेट देत कुटुंबाचे सांत्वन केले. बारामतीतील शारदोत्सवाला ते मास्क घालून दिसले होते. अजित पवारांना डॉक्टरांनी मास्क लावण्याचा सल्ला दिला होता. परंतू, अजित पवार मास्क लावून फिरताना दिसले नाहीत. यानंतर त्यांनी काटेवाडीतील मुलांनी सजवलेल्या विविध ठिकाणच्या किल्ल्यांची पाहणी केली.
दरम्यान, यंदा गोविंद बागेतील पवार कुटुंबाच्या दिवाळी पाडव्याला अजित पवार यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली.
त्यावर दादा (अजित पवार) आजारी आसल्याने गोविंद बागेत आले नाहीत – असे सुप्रिया सुळे व शरद पवार यांनी सांगितल. मात्र अजित पवार काटेवाडी येथे पाहणी करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी गोविंद बागेतील पाडवा टाळून पवार कुटुंबात दुफळी पडल्याचेच दाखवून दिले काय, अशी चर्चा आहे.