Angelo Mathews Timed Out, SL vs BAN: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 38 व्या सामन्यात असे काही घडले, जे पाहिल्यानंतर कोणाचाही विश्वास बसणार नाही. श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी क्रिजवर आला, मात्र पंचांनी त्याला माघारी जाण्यास सांगितले. पंचांनी मॅथ्यूज बाद झाल्याचे सांगितले. पंच आणि मॅथ्यूजमध्ये बराच वेळ वाद झाला, पण शेवटी त्याला माघारी जावे लागले. मॅथ्यूजची टाईम आउट झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असे घडले की फलंदाज टाईम आउट झाला.
काय आहे प्रकरण ?
बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला फलंदाजीला पाचारण केले. डावाच्या 24व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमा झेलबाद झाला. यानंतर अँजेलो मॅथ्यूजला फलंदाजीला यावे लागले. तो मैदानात आला, पण त्याच्या हेल्मेटचा पट्टा बरोबर नव्हता. अशा परिस्थितीत तो योग्य हेल्मेटची वाट पाहत राहिला आणि योग्य हेल्मेट आल्यावर तो खेळण्यासाठी सज्ज झाला. तोपर्यंत बांगलादेश संघाने त्यांच्याविरुद्ध टाइम आऊटचे आवाहन केले आणि पंचांनी मॅथ्यूजला त्यांना माघारी जाण्यास सांगितले.
Dramatic scenes in Delhi with Angelo Mathews becoming the first batter to be timed out in international cricket 👀
Details 👉 https://t.co/Nf8v8FItmh#BANvSL #CWC23 pic.twitter.com/VwjFfLHOQp
— ICC (@ICC) November 6, 2023
हे ऐकून मॅथ्यूजला आश्चर्य वाटले. त्याने पंचांना कारण विचारले तेव्हा त्याला कळले की त्याला क्रीजवर यायला खूप उशीर झाला होता आणि तो टाइमआउट झाला. यानंतर मॅथ्यूज आणि पंचांमध्ये जोरदार वादावादी झाली. मॅथ्यूजने विरोधी संघाचा कर्णधार शकिब अल हसनशीही बोलले, पण शकिबही आपले अपील मागे घेण्यास तयार नव्हता. अशा स्थितीत मॅथ्यूजला एकही चेंडू न खेळता पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. धनंजय डी सिल्वा फलंदाजीला आला तेव्हा श्रीलंकेचा डाव पुढे सरकला.
मॅथ्यूज रागाच्या भरात मैदानाबाहेर गेला. त्याने हेल्मेट आणि बॅट फेकून दिली. समालोचक वकार युनूसनेही याला खेळाच्या भावनेविरुद्ध म्हटले आहे. या संपूर्ण घटनेवर आणखी गदारोळ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजाला टाईम आउट करण्याची ही पहिलीच वेळ होती. याआधी केवळ सहा फलंदाजच टाइमआऊट झाले आहेत. सर्व प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बाद झाले होते.
नियम काय म्हणतो?
क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मिरिलिबोन क्रिकेट क्लबनुसार, विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, येणाऱ्या फलंदाजाने तीन मिनिटांत चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. असे झाले नाही तर येणारा बॅट्समन टाईम आऊट होईल. त्याच वेळी, एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या नियमांनुसार, विकेट पडल्यानंतर, नवीन फलंदाजाला दोन मिनिटांत चेंडू खेळायचा आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अशाच पद्धतीने बाद झाला होता. मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथने आपले अपील मागे घेतले आणि गांगुली पुढे खेळत राहिला. या सामन्यात शाकिब अल हसनने आपले अपील मागे घेतले नाही आणि मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइमआउट होणारा पहिला खेळाडू ठरला.