Nepal Earthquake News – नेपाळच्या पश्चिमेकडील जजारकोट आणि आजूबाजूच्या परिसराला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का (Nepal Earthquake) बसला आहे. या भूकंपात किती नुकसान झाले आहे, याचा नेमका तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही.
दोनच दिवसांपूर्वी, शुक्रवारी नेपाळच्या याच भागाला भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यामध्ये किमान 153 जण ठार झाले होते. आज दुपारी सुमारे साडे चार वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला, असे नेपाळच्या राष्ट्रीय भकंपशास्त्र केंद्राने म्हटले आहे.
या भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी नोंदली गेली आहे आणि या भूकंपाचा केंद्रबिंदू जजारकोटच्या रामिदांदा भागात होता. भूकंपाचे धक्के नेपाळची राजधानी काठमांडू आमि भारताची राजधानी दिल्लीमध्येही जाणवले.
भूकंपाच्या या धक्क्यानंतर लगेचच 4.40 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा आणखीन एक धक्का जाणवला, असे राष्ट्रीय भूकंप मापक संस्थेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.