Dussehra Festival : देशात आज विजयादशमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या. “विजयादशमीच्या देशभरातील माझ्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. हा पवित्र सण नकारात्मक शक्तींना दूर करण्याचा तसेच जीवनात चांगुलपणा अंगीकारण्याचा संदेश घेऊन येतो.” असे म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
देशभर के मेरे परिवारजनों को विजयादशमी की हार्दिक शुभकामनाएं। यह पावन पर्व नकारात्मक शक्तियों के अंत के साथ ही जीवन में अच्छाई को अपनाने का संदेश लेकर आता है।
Wishing you all a Happy Vijaya Dashami!
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2023
यासोबतच गृहमंत्री अमित शहा यांनीही सर्व देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या, “विजयादशमीच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. अधर्माचा अंधार कितीही दाट असला तरी सत्याच्या आधारावर धर्माच्या प्रकाशाचा विजय होतो. तो शाश्वत आहे. पापावर पुण्य विजयाचे प्रतीक आहे, ‘विजयादशमी’ हा सण आपल्याला सदैव बुद्धी आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो आणि शिकवतो. प्रभू श्री राम सर्वांना आशीर्वाद देवो. जय श्री राम!”
समस्त देशवासियों को ‘विजयादशमी’ की हार्दिक शुभकामनाएं।
अधर्म का अंधकार चाहे कितना भी घना क्यों न हो, सत्य के आधार पर धर्म के उजाले की विजय शाश्वत है। पाप पर पुण्य की विजय का प्रतीक ‘विजयादशमी’ हमें सदैव विवेक और सत्य के मार्ग पर चलने की प्रेरणा व शिक्षा देने वाला पर्व है।
प्रभु… pic.twitter.com/FX8bcVnNle— Amit Shah (@AmitShah) October 24, 2023
आज देशभरात दसऱ्याचा सण साजरा केला जात असून, त्यामध्ये वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाणार आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) दरवर्षी नागपुरात साजरा होणाऱ्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन आज करण्यात आला. RSS प्रमुख मोहन भागवत रेशीमबाग मैदानावर पारंपारिक दसरा मेळाव्याला संबोधित करत त्यांनी मणिपूर विषयी भाष्य केले.