नवी दिल्ली – माहिती तंत्रज्ञान नियमाचा भंग केल्याबद्दल ऑगस्ट महिन्यामध्ये व्हाट्सअपची 74 लाख खाते बंद करण्यात आल्याची माहिती व्हाट्सअप कंपनीची पालक कंपनी असलेल्या मेटा कंपनीने जाहीर केले आहे. या खात्यासंदर्भात तक्रारी येण्याअगोदरच पुढाकार घेऊन 35 लाख खाती बंद करण्यात आली होती.
काही खात्याविरोधात तक्रारी आल्यानंतर त्या सदर्भात चौकशी केल्यानंतर ही खाती बंद करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. व्हाट्सअप या समाज माध्यमाचा दुरुपयोग केला जाऊ नये असे आमची इच्छा आहे. त्यामुळे कोणी नियमाचा भंग केल्यानंतर आम्ही स्वतःही खाती बंद करतो किंवा या खात्यासंदर्भात काही तक्रार आल्यानंतर याची चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाते असे या कंपन्या स्पष्ट केले आहे.