PM Modi Birthday : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत जगातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाच्या पोस्ट ट्रेंडिंगवर आहे.
अशात अभिनेत्री कंगना राणावतच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान, कंगना राणावत ने पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना मोदींची तुलना भगवान श्री राम यांच्याशी केली. पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त कंगना राणावत ने X (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. कंगना राणावत ने पंतप्रधानांचा फोटो शेअर केला असून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
कंगना राणावत ने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘जगातील सर्वात प्रिय नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, एक सामान्य माणूस, जो आपल्या कठोर परिश्रम आणि चिकाटीने खूप उंचीवर पोहोचला आणि नवीन भारताचा निर्माता बनला. तुम्ही केवळ भारताचे पंतप्रधान नाही तर प्रभू रामाप्रमाणेच तुमचे नाव या देशाच्या चेतनेवर कायमचे अंकित आहे. सर तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा.’
या पोस्टवर पीएम मोदींनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छासाठी त्यांनी कंगनाचे आभारही मानले आहेत. याशिवाय कंगनाच्या पोस्टवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. तिच्या या पोस्टवरून तिला काही युजर्सने ट्रॉल केले आहे तर काहींनी तिचे कौतुक केले आहे.