मुंबई – सध्या सोशल मीडियावर अहमदनगर शहरातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून, आता या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात नेमकं काय-काय घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अहमदनगरमध्ये काल एका कार्यक्रमात काही युवक औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत होते, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित घटना कॅमेऱ्यातही कैद झाली असून, याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकार हा अहमदनगरच्या फकीरवाडा भागातील आहे. फकीरवाड्यात संदल उरूस उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं. या उत्साहादरम्यान काही युवक औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत होते. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. दरम्यान, अश्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
🕑2.14pm | 05-06-2023 📍Nagpur | दु. २.१४ वा. | ०५-०६-२०२३📍नागपूर
LIVE | Media interaction https://t.co/QUQms8lK6r— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 5, 2023
देवेंद्र फडणवीस म्हणाले की.., “औरंगजेबाचे फोटो जर कुणी झळकवत असेल, तर हे इथे मान्य केलं जाणार नाही. या देशात, महाराष्ट्रात आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कुणी औरंग्याचं नाव घेत असेल, तर त्याला माफी नाही…’ असा इशाराच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला.