नागपूर – नाना पटोले ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्या पक्षात प्रात:विधीला जायचं असेल तर हाय कमांडची दिल्लीवरून परवानगी लागते. त्यामुळे आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही दिल्लीला गेलो तर काय वाईट आहे, असे खोचक प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्ली वारीवरून केलेल्या टीकेला दिलं आहे.
काय म्हणाले होते नाना पटोले..
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यांवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. ते म्हणाले की, राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर यांचा दौरा तपासला तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली वारी मध्येच जास्त वेळ घालवतात.
राज्याच्या जनतेकरिता फक्त घोषणा देणे, दिल्लीवाले पंतप्रधान देशासाठी घोषणा करतात तसे हे राज्य वाले राज्यात घोषणांचा पाऊस पाडण्याचं काम करतात. यांना कायम दर दोन दिवस आड दिल्ली मध्ये बोलाविले जाते आणि त्या दिल्ली दरबारी हुजरेगिरी करण्याचा काम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतात .
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्ली दौरा केला. मागील वर्षभरात दोघेही अनेकदा दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यावरून ते टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत.