मुंबई – शाहरुख खानच्या एका झलकसाठी त्याच्या ‘मन्नत’ बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी असते.एवढंच काय एरवी देखील अनेकजण शाहरुखच्या घराबाहेर अनेक फॅन्स फोटो काढताना दिसून येतात. नुकतंच मॉडेल नवप्रीत कौरला शाहरुखच्या घरी जाण्याची संधी मिळाली. यावेळी तिने स्वतः सोशल मिडीयावर पोस्ट करत याबाबतची माहिती शेअर केली आहे.
यावेळी नवप्रीतने शाहरुख खानच्या घरी जाण्याचा आणि कुटुंबियांना भेटण्याचा तिचा अनुभव शेअर केला आहे. यावेळी शाहरुखसोबतचा एक सेल्फी देखील तिने शेअर केला आहे. नवप्रीत म्हणते की शाहरुखला भेटणे म्हणजे तिचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. तिच्या आयुष्यातील बेस्ट दिवस असे वर्णन यावेळी केले आहे. नवप्रीतने मन्नतमध्ये तिची खातिरदारी कशी झाली हे देखील सांगितले.
यावेळी शाहरुखने स्वतः तिच्यासाठी पिझ्झा बनवल्याचे समजते. नवप्रीतने आपल्या पोस्टमध्ये संपूर्ण खान कुटुंब आणि त्यांच्या वागण्याबद्दल सांगितले आहे. यासोबतच ही आठवण नेहमी सोबत ठेवू असंही तिने यावेळी म्हटलं आहे.
नवप्रीतने आपल्या पोस्टमध्ये लिहिले- ‘मी स्वतःला प्रॉमिस केलं होत की मी हे कधीही पोस्ट करणार नाही, परंतु ही आठवण माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. मन्नतमध्ये माझा सर्वात छान दिवस होता. किंग, शाहरुख खानने स्वतः माझ्यासाठी पिझ्झा बनवला, तोही व्हेज, कारण काही पंजाबी व्हेजही आहेत. जोपर्यंत मी त्याच्या घरात होते, तोपर्यंत मला सतत असे वाटत होते की मी स्वप्न पाहत आहे आणि कोणीतरी येऊन मला लवकर उठवेल. पण, मी स्वत:ला शांत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मला आनंदाने उड्या मारल्यासारखे वाटले.
‘मी खान कुटुंबियांसोबत जेवणाच्या टेबलावर बसले होतो. पूजा ददलानी देखील आमच्यासोबत होती. मी वॉशरूमचा रस्ता विचारल्यावर शाहरुख खुर्चीवरून उठला आणि मला स्वतः वॉशरूमपर्यंत घेऊन गेला. आपुलकीच्या स्वभावाचा हा क्षण खूप भारी होता असं देखील नवप्रीतने यावेळी म्हंटले. त्यानंतर मी पुन्हा डायनिंग टेबलवर येऊन बसले आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला असं देखील नवप्रीतने यावेळी म्हंटले आहे.
नवप्रीतने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले- ‘गौरी खान डार्लिंग आहे. अबराम माझा नवीन चांगला मित्र बनला आहे. तथापि, मला माहित आहे की काही दिवसांनी मला त्यांची आठवण होणार नाही. आर्यन एक जंटलमन आहे. सुहाना खूप क्यूट आहे. पूजा तर आयकॉनिक आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही की मी शाहरुख खानच्या घरी मन्नतला गेले होतो. आत्तापर्यंत ते सर्व स्वप्नवत असल्यासारखे वाटत असल्याचे नवप्रीतने यावेळी म्हंटले.