चेन्नई :- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 270 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
मोहम्मद सिराजने स्टार्कला बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. स्टार्कने 10 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना कांगारू संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही आणि 49 षटकांत 269 धावांवर आटोपला. चेन्नईतील खेळपट्टी फलंदाजीसाठी फारशी सोपी नाही, त्यामुळे या लक्ष्याचा पाठलाग करणे भारतासाठी फारसे सोपे नसेल.
Innings Break!
Australia are all out for 2⃣6⃣9⃣ in the first innings!
3️⃣ wickets each for @hardikpandya7 & @imkuldeep18
2️⃣ wickets each for @akshar2026 & @mdsirajofficialOver to our batters 💪🏻
Scorecard ▶️ https://t.co/eNLPoZpkqi #TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/2LcTkRSPiC
— BCCI (@BCCI) March 22, 2023
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 47 तर एलेक्स कैरी याने 38 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दरम्यान, सामना जिंकून मालिका जिंकण्याचं भारताचे लक्ष असेल. भारताने मुंबईतील पहिला वनडे पाच विकेटने जिंकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने विशाखापट्टणममधील दुसरी वनडे 10 गडी राखून जिंकली. अशाप्रकारे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.