नवी दिल्ली – पटणा रेल्वे स्थानक सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनले आहे. याचे कारणही खास आहे. तिथल्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना काय बघायला मिळालं याची कुणी कल्पनाही केली नसेल. ट्रेनची वाट पाहत बसलेल्या लोकांना अचानक स्क्रीनवर अडल्ट व्हिडिओ पाहायला मिळाला. हा व्हिडिओ प्ले होताच स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. हे प्रकरण इतके वाढले की ट्विटरवर हॅशटॅग पटना देखील ट्रेंड होऊ लागले.
पटना रेल्वे स्थानकावरील हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगात व्हायरल झाला. सोशल मीडियावर तर याचीच चर्चा पाहायला मिळाली. काही नेटकऱ्यांनी तर हा व्हिडीओ कोणत्या अडल्ट स्टारचा आहे हे देखील सांगायला सुरुवात केली. यामुळे संपूर्ण दिवस ट्विटरवर केवळ याच विषयाची चर्चा होती. पटणा रेल्वे स्थानकावर काही सेकंद नाही तर तब्बल तीन मिनिट हा व्हिडीओ सुरु होता. पटणा जंक्शन येथील या विचित्र घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. याप्रकरणी रेल्वेच्या वतीने संबंधितांवर कारवाई करण्यात आली असल्याचे देखील समोर आले आहे.
अनेकांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ अडल्ट स्टार केंद्रा लस्टचा असल्याचा दावा केला आहे. तिने आपल्या फोटोसह ‘इंडिया’ असे देखील ट्विट केले आहे. यासोबत तिने हॅशटॅगमध्ये बिहार रेल्वे स्टेशनचा देखील वापर केला आहे. तिच्या पोस्टवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.
बताओ अब ये लोग…रेलवे स्टेशन पर अश्लील वीडियो दिखाएंगे
मामला पटना का है।।। pic.twitter.com/PNOyYVTSPG— Komal Nigam (@komalnigam0503) March 20, 2023
एका यूजरने लिहिले थेट या अडल्ट स्टारला टॅग विचारले की, “तो तुमचा व्हिडिओ आहे का ?, तुम्हाला माहिती आहे का?” यावर प्रतिक्रिया देताना केंद्राने उत्तर दिले की ‘मला आशा आहे की तो माझाच आहे.यासह अभिनेत्रीने बिहार आणि पटनाबाबतचे अनेक मिम्स देखील शेअर केले आहेत. अनेक नेटकरी या मिम्सचा आनंद घेत पटना हॅशटॅगचा वापर करत आहेत.