मुंबई – नुकतंच आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली असून, पहिल्यांदाच दहा संघ खेळताना दिसून येत आहे. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन नवीन संघांची भर यावेळी पडली आहे. नुकतंच, या दोन संघांमध्ये जोरदार सामना रंगला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सवर पाच विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. मात्र, या विजयात मोलाचा वाटा उचलला तो म्हणजे मोहम्मद शमीने.
मोहम्मद शमीने नवीन संघाकडून खेळताना पाहिल्याच सामन्यात आमच्या गोलंदाजीची कमाल दाखवली. शमीने तीन महत्वाच्या विकेट्स घेत दणक्यात यंदाच्या पर्वाचा श्रीगणेशा केला. शमीच्या या तुफान खेळीचे सर्वच जण फॅन झाले असून, एक व्यक्ती तर त्याच्या चांगलीच प्रेमात बुडाली आहे. हो… ती व्यक्ती कोणी बॉलिवूड स्टार नाही ती क्रिकेटची खूप मोठी चाहती आहे.
Absolutely wonderful performance by @mdshami11 😍👏#LSGvsGT #IPL2022
— Kendra Lust™ (@KendraLust) March 28, 2022
अडल्ट फिल्म इंडस्ट्रीमधील पॉर्नस्टार ‘किंद्रा लस्ट’ हिने ट्विट करत मोहम्मद शमीचे तोंड भरून कौतुक केलं आहे. किंद्रानं ट्विटमध्ये लिहलं की… “मोहम्मद शमीने अगदीच छान कामगिरी केलीय..’ यामध्ये तिने इमोन्जी सुद्धा वापरले असून शमीला टॅग केलं आहे. क्रिंदाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
View this post on Instagram