नवी दिल्ली – भारताची आव्वल महिला मुष्टियुद्धपटू नितू घांघस हिने येथे सुरू असलेल्या जागतिक महिला मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नितूने 48 किलो वजनी गटात ताझीकिस्तानच्या सौमय्या कोसीमकोव्हाचा पराभव केला.
नितुची सहकारी खेळाडू मनिषा मौन हीनेही आकेगूच कायम राखताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तुक्रीच्या नूर एलिफ तुरहानचा पराभव केला.
#WPL2023 #RCBvMI : अमेलिया केरची अष्टपैलू कामगिरी; मुंबईचा बंगळुरुवर सहज विजय
भारताची आणखी एक स्टार खेळाडू शशी चोप्राला मात्र, जपानच्या मेइ किटोकडून 4-0 असा पराभव पत्करावा लागला. तसेच अव्वल खेळाडू व ऑलिम्पिकपटू लवलिना बोर्गोहेन हिने मेक्सिकोच्या वेनिसा ओटींझ हिला 75 किलो वजनी गटात 5-0 असे पराभूत केले.
भारताची नवोदित खेळाडू प्रीती हिला थायलंडच्या जितपोंग जुतामस हिच्याकडून 4-3 असा पराभव स्वीकारावा लागला.