मुंबई – बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता ‘अजय देवगण’ सध्या त्याच्या ‘भोला’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर काही दिवसांपूर्वी समोर आला होता. लोकांना तो खूप आवडला. ज्यामध्ये अजय देवगणचा वेगळा लूक पाहायला मिळाला आहे. हा चित्रपट अभिनेत्याचा आतापर्यंतचा सर्वात साहसी चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. ही एका माणसाच्या सैन्याची कहाणी आहे जी वेगवेगळ्या वेषात मानव आणि इतर शत्रूंच्या सैन्याशी लढते.
अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बूचा भोला 30 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. खुद्द अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे. त्यामुळे, ‘भोला’ या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुद्धा सुरुवात झाली असून,
दोन-तीन तासांतच आयमॅक्स आणि 4 डीएक्स व्हर्जनसह संपूर्ण देशात जवळपास 1200 तिकिटं विकली गेली. या तिकिटांमधून जवळपास 7 लाख रुपयांहून अधिक कमाई झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, ‘भोला’ हा 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कैथी’ या तमिळ सुपरहिट चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. यामध्ये अजयसोबत अभिनेत्री तब्बूची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.