पाटण गोळीबारप्रकरणी अजित पवार विधानसभेत कडाडले
सातारा – पाटण तालुक्यात रविवारी सायंकाळी शिवसेनेचे ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद आज विधानसभेत उमटले. राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
मदन कदम यांनी काल गोळीबार केला यात दोघांचा मृत्यू झाला, तिसरा व्यक्ती अतिशय गंभीर आहे. मंत्री शंभूराज देसाई या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. कदम ठाणे येथील माजी नगरसेवक आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील माजी नगरसेवक आहे. मुलाचा अपघात झाला म्हणून गोळीबार करावा ही काय मोगलाई आहे का, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या कामास सुरुवात झाली. यावेळी कामकाजास सुरुवात होताच अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवरून तसेच कर्मचाऱ्यांच्या संपावरून शिंदे- फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संप करत आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही.
यावेळी पवारांनी पाटण येथील गोळीबाराच्या घटनेचाही सभागृहात उल्लेख केला. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत तर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील ठाणे येथील कदम हे माजी नगरसेवक आहे. मुलाचा अपघात झाला म्हणून गोळीबार करावा ही काय मोगलाई आहे का, असा सवाल अजित पवारांनी सभागृहात उपस्थित केला.