राजेंद्र वाघमारे
नेवासा – सद् रक्षणाय…खलनिग्रहणाय… हे बिद्र वाक्य घेवून जनतेच्या रक्षणासाठी चौविस तास सज्ज राहणाऱ्या नेवासा पोलीसांना आपले पहीले पोलीस निरिक्षक बदलून पंधरा दिवस झालेले असतांना नविन पोलीस अधिकाऱ्यांनी पदभार हाती घेतलेला विसर पडला असून चक्क आजही नेवासा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत अधिकाऱ्यांच्या सहीच्या जागी बदली झालेले पोलीस निरिक्षक विजय मारुती करे याच अधिकाऱ्यांचे नांव येत असल्यामुळे नेवासा पोलीस ठाण्याचा कारभार कसा ‘वराती मागून घोडे’ दामटण्याच्या सदरात मोडणारा असल्याची प्रचिती सध्या नेवासकरांना येत आहे.
नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरिक्षक विजय करे यांची बदली कर्जत येथे झालेली असून त्यांच्या जागेवर शिवाजी डोईफोडे या नव्या पोलीस अधिकाऱ्यांनी पदभार स्विकारुन पंधरा दिवस उलटून गेलेले आहेत तरीही नेवासा पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या फिर्यादीत अधिकाऱ्यांच्या सहीच्या जागी पद विजय मारुती करे इन्सपेक्टर असेच येत असून फिर्याद दाखल करत असणारे ठाणे अमंलदार कसे झोपेत काम करत आहेत याचा या निमित्ताने नेवासकरांना चांगलाच प्रत्यय येत आहे.
नव्याने रुजू झालेले पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे हे कडक शिस्तीचे अधिकारी असून त्यांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी आपल्या सहकार्यांना विश्वासात घेवून कामकाज सुरु केलेले आहे माञ या पोलीस ठाण्यात बुधवार (दि.१५) रोजी दाखल झालेल्या एका फिर्यादीत पहील्या पोलीस अधिकाऱ्यांच्याच नावाचा नामोल्लेख येत असल्यामुळे येथील ठाणे अमलदारांचे डोळे कधी उघडणार ? असा सवाल उपस्थित होतांना दिसून येत आहे.