नवी दिल्ली – चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका सध्या भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु आहे, त्यातील शेवटचा सामना सध्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. यादरम्यान अहमदाबाद ग्राउंडवर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होता. यावेळी मॅच पाहण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मॅचदरम्यान भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी ज्यावेळी इतर खेळाडूंसोबत मैदानावर होता त्यावेळी मॅच पाहायला आलेल्या काही प्रेक्षकांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. शमी समोर दिसताच या प्रेक्षकांच्या घोषणा अधिक वाढल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. मॅच पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी असं कृत्य केल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. यादरम्यान गर्दी इतकी होती की शमीवर याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. प्रेक्षकांच्या या कृत्याचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
लंच ब्रेकनंतर भारतीय क्रिकेटपटू मैदानात येत होते, तेव्हा मोहम्मद शमीला पाहून प्रेक्षकांमधील जय श्री रामच्या घोषणाबाजी सुरू केली. अशा प्रकारांवर शमीने कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी शमीचे कौतुक केले आहे.
“Shami… Jai Shree Ram”…
If this indeed happened before the start of the 4th test of the #BorderGavaskarTrophy in Ahmedabad, it makes me puke at the insensitivity from certain pricks.
I’d ban these fellows from attending any games here after! pic.twitter.com/AYHK2W5suw
— Saikiran Kannan | 赛基兰坎南 (@saikirankannan) March 10, 2023
लंच ब्रेकनंतर खेळ सुरू झाला तेव्हा रविचंद्रन अश्विनने भारतीय क्रिकेट संघाला यश मिळवून दिले. चांगल्या लयीत दिसणाऱ्या कॅमेरून ग्रीनला त्याने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने फलंदाजीला आलेल्या नवीन फलंदाज अॅलेक्स कॅरीलाही बाद केले. यामुळे मैदानात देखील प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळाला.