मुंबई – अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट ‘हेरा फेरी’च्या तिसऱ्या पार्टची सध्या जोरदार चर्चा आहे. हेरा फेरीच्या तिसऱ्या भागात संजय दत्तची एंट्री होणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. स्वतः संजुबाबाने याबाबत खुलासा करत आपण हेरा फेरीच्या तिसऱ्या पार्टमध्ये दिसणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
संजय दत्त नुकताच एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचला होता. जिथे त्याने मीडियाशी संवाद साधला. यावेळी चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्याशी असलेल्या त्याच्या बाँडिंगबद्दलही सांगितले. संजय म्हणाला, ‘ही एक अप्रतिम फ्रँचायझी आहे आणि त्याचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे. फिरोज आणि माझे नातेही खूप जुने आहे. अक्षय कुमार, संजय दत्त आणि परेश रावल यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान आहे.
हेरी फेरी चा दुसरा पार्ट 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता तिसऱ्या पार्टने याची उत्कंठा आणखी वाढवली आहे. या चित्रपटात संजय दत्त खलनायक रवि किशनच्या मोठ्या भावाची भूमिका साकारणार असून तोतला गँगचा महत्त्वाचा भाग असेल. स्वत: संजय दत्तने या चित्रपटातील एंट्रीची पुष्टी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
#SanjayDutt confirmed that he will be a part of #herapheri3….It’s going to be interesting to watch Sanju Baba in “TotlaGang”😂🔥#AkshayKumar #pareshrawal #SunielShetty pic.twitter.com/5CvBOD3TSz
— ༄༒Swєtα🔥࿐ (@Swetaakkian) March 4, 2023
गेल्या काही दिवसांपासून हेरा फेरीच्या तिसऱ्या पार्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सुरुवातीला अक्षय कुमार या चित्रपटात दिसणार की नाही याबाबत चर्चा होती. मात्र शुटिंग दरम्यानचे अक्षयचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर चित्रपटाबाबतची उत्कंठा आणखी वाढली आहे.